क्वाँटम् गतिसिद्धान्ताचा आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक भांडवलदारीवरील परिणाम
[थत्ते स्मृती व्याख्यान मालेमधील सोळावे पुष्प गुंफताना ११ जानेवारी २००१ रोजी नागपुर विद्यापीठात प्रा. पानटानी दिलेल्या व्याख्यानाचा गोषवारा] मला थत्ते स्मृती व्याख्यान देण्याकरता ट्रस्टचे विश्वस्तांनी जे निमंत्रण दिले त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक ऋणी आहे. नागपूर विद्यापीठाने भारतास जे विविध पदार्थवैज्ञानिक पुरवले त्यांचे शिल्पकार प्रा. थत्ते असल्याने, हे भाषण देण्यासाठी मला बोलावल्यावर जरा धास्तीच वाटली. तरी …